इंदापूर, दि.१३मे २०२०: बावडा (ता.इंदापूर) येथील इमारत गेल्या दोन वर्षापासून बांधून तयार आहे. मात्र अजूनही या रुग्णालयात सरकारने कोणतीही डॉक्टर, आरोग्य कर्मचारी किंवा इतरांची नेमणूक केलेली नाही. मंगळवारी दि.१२ रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी याबाबत प्रश्न उपस्थित करून हे रुग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी मागणी केली होती. त्याबाबत बुधवारी दि.१३ रोजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी या इमारतीची पाहणी केली.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुरेखा पोळ, बावडा ग्रामपंचायतचे सरपंच करण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे व बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. वाघमारे यांच्यासमवेत केली. सद्यस्थितीला बाहेरून अनेक कामगार लोक व इतर नागरिक इंदापूर तालुक्यात येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारच्या नियमानुसार त्यांना १४ दिवस क्वारांटाईन करण्याची सुविधा आपण येथे उपलब्ध करू शकतो किंवा संशयित रुग्णांना किंवा बाधित रुग्णांना प्राथमिक उपचार देखील येथे करू शकते.
या दृष्टिकोनातून येथील रुग्णालयात लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी “न्यूज अनकट”शी बोलताना सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे