कांदा भजी ही महाराष्ट्रातील एक अतिशय प्रसिद्ध डिश आहे. पुण्याहून सिंहगड किल्ल्या वर खास कांदा भजी खाण्यासाठी लोक येतात. पावसाळ्याच्या दिवसात बरेच लोक खास या ठिकाणी कांदा भजी आणि कांद्याच्या चटणी खाण्यासाठी भेट देतात. या प्रकारचे भजी आणि चटणी बनवण्याचे तंत्र वेगळे आहे आणि आज आपण त्याची तपशीलवार रेसिपी पाहणार आहोत.
साहित्य : २ मध्यम आकार कांदा, मीठ १ टीस्पून, ओवा १ टीस्पून, चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट २ टीस्पून, हळद: १ / २ टीस्पून, पाणी, बेसन, गरम तेल
कांदा चटणीसाठी : चिरलेला कांदा १ मध्यम आकार, लाल तिखट १ चमचे, मीठ, उकळत्या गरम तेल २ टेस्पून
कृती : एका भांड्या मध्ये चिरलेला कांदा मीठ घालून चांगले मिक्स करून १५ मिनिटांसाठी बाजूला ठेवावे. जिरे, ओवा भज्याच्या मिश्रणात मध्ये घाला. बारीक कोथिंबीर, तिखट, हळद घालून चांगले एकत्र करा आता यात बेसन पीठ घाला, पाणी न घालता चांगले मिक्स करून घ्या, नंतर यात चिमूटभर बेकिंग सोडा घालून चांगले मिसळा. एका भांड्यात तेल गरम करायला घ्या तेल गरम झाल्यावर भजी खरपूस होई पर्यंत तळून घ्या.
चटणी : चटणी साठी एका वाटीत चिरलेला कांदा, लाल तिखट आणि हळद घालून फ्राय पॅनमधून उकळत्या गरम तेल घालून मिक्स करून चटणी बनवून घ्या
गरमागरम कांदा भजी मसालेदार चटणी आणि गरम मसाला चहा बरोबर सर्व्ह करा.
न्यूज अनकट प्रतिनिधी