राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) जम्मू-काश्मीरचे माजी उपअधीक्षक दविंदरसिंग यांच्या विरूद्ध दाखल केले आरोपपत्र

जम्मू काश्मीर, ७ जुलै २०२० : एन आय ए ने जम्मू काश्मीरचे माजी उपअधीक्षक दविंदरसिंग आणि त्याच्या पाच साथीदारांविरूद्ध जम्मूच्या एनआयए कोर्टात बेकायदेशीर कृती (प्रतिबंध) कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे.

पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना हिज्ब-उल-मुजाहिद्दीन आणि पाकिस्तानी राज्य एजन्सींनी हिंसक कृत्ये करण्याच्या आणि भारताविरूद्ध युद्ध पुकारण्याचा कट रचल्या प्रकरणी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा आरोप एनआयएच्या तपासात समोर आला आहे. घटनेतील ५ आरोपी या शस्त्रांची तस्करी आरोपी माजी उपअधीक्षक दविंदरसिंग यांच्या मदतीने करत होते. ते सीमा ओलांडून ही शस्त्रे आणि दारूगोळा भारतात आणत होते, असेही तपासात पुढे आले आहे. नंतर ही शस्त्रे दहशतवादी कारवायांसाठी वापरली जात असत.

दविंदरसिंग सध्या कठुआच्या हेरानगर कारागृहात बंद आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील वानपोह परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील चौकीवरून हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या नावेद मुश्ताक उर्फ ​​नावेद बाबू आणि रफी अहमद राथर यांच्यासह त्याला अटक करण्यात आली होती. इतर तीन दहशतवाद्यांमध्ये इरफान शफी मीर, तनवीर अहमद वानी आणि सय्यद इफरान अहमद यांचा समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा