बंगळुरू, ८ सप्टेंबर २०२२: १० दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बंगळुरुतील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळं गरीब व मध्यमवर्गीयांवर आभाळ तर कोसळलेच आहे पण श्रीमंतांनाही या स्थितीचा गंभीर फटका बसला आहे.
बंगळुरुच्या एप्सिलॉन भागात अनेक कंपन्यांचे संस्थापक व सीईओ राहतात. हे संपूर्ण क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. या कम्युनिटीत निवडक १५० जण राहतात. त्यात विप्रोचे चेअरमन रिशद प्रेमजी, ब्रिटानियाचे सीईओ वरुण बेरी, बिग बास्केटचे सह-संस्थापक अभियन चौधरी व बायजूसचे सह-संस्थापक रविचंद्रन यांचा समावेश आहे.
एप्सिलॉनमधील एका सामान्य व्हिलाची किंमत १० कोटी आहे. येथील प्लॉटच्या साइजच्या हिशेबाने किंमती वाढतात. एक एकरच्या प्लॉटची किंमत जवळपास ८० कोटींच्या घरात असते.
एवढी महागडी सोसायटी असूनही ती पुराच्या तडाख्यापासून वाचली नाही. अनेक लग्झरी कार्सही पाण्यात बुडाल्या आहेत. येथे राहणाऱ्या श्रीमंतांना नावेच्या मदतीने बाहेर काढले जात आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे