गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची कोरोनावर मात

मुंबई, दि.११ मे २०२० : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना शनिवारी ( दि.९) रोजी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

राज्याच्या मंत्र्याला कोरोनाची बाधा होऊनही त्याबाबत माध्यमांमध्ये फारशा बातम्या येऊ न देण्याची खबरदारी सरकारकडून घेण्यात आली होती. स्वतः आव्हाड यांनीच आज ट्वीट करून त्यांना कोरोना झाला होता, हे मान्य केले.
तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कात आलेल्या काही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने १३ एप्रिलपासून त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले होते. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. तिचा अहवाल निगेटीव्ह आला होता. त्यानंतर २१ तारखेला त्यांना पुन्हा ताप आला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना एक महिना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

यासंदर्भात स्वतः आव्हाड यांनी ट्वीट करून आपले मित्र, चाहते व कार्यकर्ते यांना माहिती दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा