प्लाज्मा थेरेपी कोरोना वर कितपत प्रभावी

कोरोना वायरसच्या संबंधीत अनेक वेगवेगळे उपाय सध्या सगळीकडे चर्चेमध्ये आहेत. हैड्रोक्सीक्लोरोक्वीन असो किंवा इतर औषधांचा वापर सर्वत्र जगात सुरू आहे परंतु या औषधाचा देखील या वायरस वरली कायमस्वरूप इलाज म्हणून वापरले जात नाही तर केवळ पर्याय म्हणून वापरले जात आहे. या सर्वांमध्ये आता प्लाज्मा थेरेपीची देखील चर्चा होत आहे. अर्थात भारतात याविषयी नुकतीच चर्चा सुरू झाली आहे परंतु या थेरेपीचा वापर चीनमध्ये दोन महिन्यांपूर्वीच करण्यात आला होता.

कोरोना व्हायरसचे उगमस्थान मानल्या जाणा-या वुहान शहरात बरे झालेल्या रुग्णांचा प्लाज्मा या थेरपी मध्ये वापरण्यात आला होता व त्याचा परिणाम देखील सकारात्मक दिसला होता. चीन नंतर इतर देशांमध्ये देखील या प्लाज्मा थेरेपीचा वापर करण्यात आला होता. सर्वत्र याचा सकारात्मक परिणाम आढळून आला आहे. या अनुषंगाने आता भारतामध्ये देखील ही थेरेपी वापरली जात आहे.

भारतामध्ये प्रथम दिल्लीमध्ये प्लाज्मा थेरेपीचा वापर करण्यात आला. याचा सकारात्मक परिणाम दिसल्यानंतर आता देशात वेगवेगळ्या ठिकाणी प्लाज्मा कलेक्शनचे काम सुरू झाले आहे. तर काय आहे हे प्लाज्मा थेरेपी, याचा किती प्रमाणात रुग्णांना फायदा होतो तसेच कोरोना वर हा उपाय मानला जाऊ शकतो का याविषयी जाणून घेऊया.

प्लाज्मा हा एक रक्तातील घटक आहे. ज्याप्रमाणे मानवी रक्तामध्ये तांबड्या पेशी , पांढ-या पेशी व इतर घटक असतात त्यामध्ये प्लाज्मा देखील असतो. प्लाज्मा मध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रथिने ( प्रोटिन्स्) असतात. या प्रथिनांपासून (प्रोटिन्स) अँटीजीन बनवले जाते. तर हे अँटीजीन काय असतात तर एखादा विषाणू (व्हायरस) किंवा जिवाणू (बॅक्टेरिया) च्या बॉडीचे वेगळे पार्टस असतात. जेव्हा शरीरामध्ये असे विषाणू किंवा जिवाणू प्रवेश करतात तेव्हा असे प्रथिने (प्रोटिन्स) तयार केले जातात त्याला अँटीबॉडीज् असे म्हणतात.

जेव्हा मानवी शरीराला कोणत्याही विषाणूचे संक्रमण होते किंवा जिवाणूचे संक्रमण होते तेव्हा आपल्या शरिरातील रोग प्रतिकारक यंत्रणा त्या विशेष विषाणूच्या विरोधात अँटीबॉडीज तयार करण्यास सुरुवात करते. साधारणता जेव्हा एखादा विषाणू शरीरामध्ये प्रवेश करतो तेव्हा १२ ते १४ दिवसांच्या कालावधीमध्ये शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होण्यास सुरुवात होते.

एखादा सुदृढ व्यक्ती ज्याची प्रतिकार शक्ती इतरांच्या तुलनेत अधिक आहे की व्यक्ती अँटीबॉडीज प्रभावीपणे तयार करण्यास सक्षम असतात. ह्या अँटीबॉडीज म्हणजेच वेगवेगळे प्रथिनेच असतात. हि प्रथिने विषाणूला शरीरातून संपविण्याचे काम करतात आणि हि प्रथिने किंवा अँटीबॉडीज् रक्तातील प्लाज्मा मध्ये असतात. म्हणजेच जर एखाद्या विषाणूचे संक्रमण पसरत असेल तर एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये त्याविरोधात अँटीबॉडीज् तयार झाल्या तर त्या अँटीबॉडीज् दुसऱ्या व्यक्तिच्या शरीरामध्ये सोडून तो विषाणू नष्ट करण्यास उपयोग होऊ शकतो. यालाच प्लाजमा थेरेपी असे म्हणतात.

सध्या ही थेरेपी कोरोना विषाणूमुळे सर्वत्र चर्चेत आहे परंतु ही पद्धत या आधी सुद्धा वापरली गेलेली आहे. कोरोनाच्या बाबतीत बोलायचे झाले तर चीनमध्ये प्रथमत: कोरोना विषाणूवर उपाय म्हणून ही थेरेपी वापरली गेली आणि आता त्याचा अवलंब सर्वत्र केला जात आहे. दिल्लीमध्ये याचे यशस्वी परीक्षण झाल्यानंतर आता पूर्ण देशांमध्ये यावर काम चालू झाले आहे.

कोरोना संसर्गित व्यक्ती जेव्हा बरा होतो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये या विषाणूच्या विरोधात अँटीबॉडीज् तयार झालेल्या असतात. परंतू प्रत्येकाच्या शरीरात या अँटीबॉडीज् तयार होऊ शकतील असे नाही. एखाद्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास अशा अँटीबॉडीज् त्याच्या शरीरामध्ये तयार होत नाही. त्यामुळे बरा झालेल्या पेशंटच्या रक्तातील प्लाजमा काढून घेतला जातो. या प्लाज्मा मध्येच अँटीबॉडीज असतात हा प्लाज्मा संसर्गित व्यक्तीच्या शरीरामध्ये सोडला जातो. प्लाज्मा शरीरामध्ये सोडल्यानंतर १० ते १२ दिवसानंतर पेशंटची प्रकृती हळूहळू सुधारण्यास सुरुवात होते.

इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की प्लाज्मा थेरेपी हा यावरिल उपाय नाही. हा केवळ एक पर्याय समजला जात आहे. जोपर्यंत यावर योग्य व्हॅक्सिन निघत नाही तोपर्यंत या विषाणूचा धोका टळणार नाही. सध्या याच्यावर कोणतेही औषध निघालेले नाही. त्यामुळे हैड्रोक्सीक्लोरोक्वीन वापरून हे इन्फेक्शन कमी होईल असाही गैरसमज करून घेऊ नये. त्याचबरोबर प्लाज्मा थेरेपीने प्रत्येकावर उपचार करता येईल असेही समजू नये . हे केवळ एक पर्याय म्हणून वापरले जात आहे. त्यामुळे शक्य होईल तेवढे बाहेर जाणे टाळा व स्वतःला प्रभावित होण्यापासून वाचवा.

-ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा