पुणे, १२ फेब्रुवरी २०२१: आजगयात अनेक फसवाफसवी अर्थात फ्राॅडचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मोबाईलने पेमेंट करणे सध्या फार सोपे आहे. मात्र लोकांच्या मेहनतीने पैसे लुटण्यासाठी भामटे लोक याचा वापर करून फसवणूक करतात. गेल्या काही वर्षांपासून कित्येक प्रकाराचे ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार उघडकीस आले आहेत. ज्यामुळे ग्राहकांना धक्का बसला असून मोठ्या प्रमाणात त्यांच्या पैशांचे नुकसान झाले आहे.
QR स्कॅम….
सध्या लोकांना मुर्ख बनवून त्यांच्याकडून पैसे काढून घेण्यासाठी QR कोड वापरला जातो. नुकतेच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता केजरीवाल फसवणूकीला बळी पडली आहे. हर्षिता ही OLX वर सोफा विकण्याचा प्रयत्न करत होती. ऑनलाईन स्कॅम द्वारे ३४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.
हा स्कॅम होतो कसा?……
कोणत्याही वेबसाईटवर काही वस्तू विकण्यास ठेवल्या या घोटाळ्याची सुरवात होते. भामट्यांचे लक्ष याकडे गेल्या नंतर ते वस्तू विकत घेण्यास ईच्छुक आसल्याचे संपर्क साधतात. वस्तू विकणारा जर डील करण्यास तयार झाल्यावर भामटे हे त्यांचा विश्वास संपादन करून UPI चा वापर करतो.
नंतर फसवणूक करणारा भामटा हा पिडित व्यक्तीची वस्तू खरेदी करण्याच्या निमित्ताने पैसे स्विकारण्यासाठी QR कोड किंवा विनंती पाठवतो. भामटा हा विक्रेत्याला अगाऊ रक्कम किंवा टोकन रक्कम भरण्यासाठी, QR कोड शेयर करतो.
सतत्या प्रस्थापित केल्यावर भामटा हा अधिक प्रमाणात एक नवीन QR कोड तयार करतो. आणि इच्छीत पिडित व्यक्तीला व्हाॅटसॲप वर आणि इमेल वर शेयर करतो.
बर्याच प्रकरणामधे फसवणूक करणारा अनावश्यक अर्जंसी निर्माण करतो आणि विक्रेत्यास एकतर QR कोड स्कॅन करण्यास किंवा पेमेंटची विनंती स्वीकारण्यास सांगतो. अन्यथा व्यवहार रद्द होईल असे सांगतो. फसवणूक करण्यार्यास हा प्रकार जेव्हा कळतो तेव्हा विक्रेता यशस्वीरित्या QR कोड स्कॅन करतो किंवा विनंती स्वीकारत आहे,सांगत तो/ती सहज दृश्यातून अदृश्य होतात.
अश्या प्रकरणा आधी आपण काय केले पाहीजे……
लक्षात ठेवण्याची मूलभूत गोष्ट म्हणजे सर्व युपीआय ॲप्स वापरकर्त्यांना पेमेंट करताना त्यांचा युपीआय पिन किंवा एम-पिन प्रविष्ट करण्यास सांगतात. पेमेंट स्वीकारण्याची आवश्यकता नाही. QR कोड स्कॅन केल्यानंतर ॲपने आपल्याला हा पिन ठेवण्यास सांगितले तर व्यवस्थित व्यवहार रद्द करा.पाठविलेल्या पेमेंट रिक्वेस्टसाठी हिच बाब लागू होते.
लक्षात ठेवा की केवळ पेमेंट करण्यासाठी आञि आणि पैसे प्राप्त करण्यासाठी QR कोड स्कॅन करणे आवश्यक आहे. अज्ञात व्यक्तींनी पाठवलेले QR कोड स्कॅन करू नका आणि आपली बॅंकिंग डिटेल्स कोणाला ही सांगू नका.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव