गोल पोस्ट इतर हृतिक रोशनने घेतले आपले स्वप्नातील घर, किंमत ९७.५० कोटी रुपये…

हृतिक रोशनने घेतले आपले स्वप्नातील घर, किंमत ९७.५० कोटी रुपये…

मुंबई,२५ ऑक्टोबर २०२०: अभिनेता हृतिक रोशनने मुंबईतील जुहू-वर्सोवा लिंक रोडवर दोन आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहेत. बऱ्याच दिवसांपासून त्याच्या ड्रीम हाऊसची वाट पाहत हृतिकने ९७.५० कोटी रुपये देऊन दोन नवे अपार्टमेंट त्याच्या नावावर केल्या आहेत.

रिपोर्ट्सनुसार, हृतिकला नेहमीच सी-फेसिंग अपार्टमेंट हवे होते. त्याला हव्या असलेल्या ह्या विशिष्ट घरासाठी तो शोध घेत होता. त्यामुळे त्याचे घराचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. मात्र, आता या अभिनेत्याचा हा शोध संपला आहे व त्याचे घराचे स्वप्न देखील पूर्ण झाले आहे.

जुहू-वर्सोवा लिंक रोडवर घेण्यात आलेले हे दोन अपार्टमेंट ३८,००० चौरस फूट भागात पसरलेले आहेत. हृतिकचे हे दोन्ही अपार्टमेंट इमारतीच्या १४ व्या, १५ व्या आणि १६ व्या मजल्यावर आहेत आणि त्यांना ६५०० चौरस फूट खुली छत एकत्र मिळाली आहे. मन्नत असे या इमारतीचे नाव आहे.

या व्यतिरिक्त असे सांगितले जात आहे की स्पेशल लिफ्टशिवाय १० पार्किंग लॉटही अपार्टमेंटमध्ये असणार आहेत. ह्या घरांची खरेदी करण्यापूर्वी हृतिकने प्रत्येक सुविधांची पूर्ण काळजी घेतली आहे. या दोन घरांसाठी हृतिकने समीर भोजवानी नावाच्या बिल्डरबरोबर दोन प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन केले आहे. हा संपूर्ण व्यवहार ९७.५० कोटी रुपयांचा असल्याचे समजते.

या व्यवहाराविषयी सांगताना अभिनेत्याने सांगितले की डुप्लेक्स साठी ६७.५० कोटी रुपये दिले आहेत, तर अभिनेताने दुसर्‍या अपार्टमेंटसाठी म्हणजेच ११.१६५.८२ चौरस पोटासाठी ३० कोटी रुपये दिले आहेत. याशिवाय १.९५ कोटी रुपये मुद्रांक शुल्क म्हणूनही देण्यात आले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version