गोल पोस्ट गुन्हा पाकिस्तानः १५ जणांनी दोन बहिणींवर ६ दिवस केला बलात्कार, बनवला व्हिडिओ

पाकिस्तानः १५ जणांनी दोन बहिणींवर ६ दिवस केला बलात्कार, बनवला व्हिडिओ

फैसलाबाद,२५ ऑक्टोबर २०२०: आपल्या मुलींवर सहा दिवस बलात्कार केल्याचा आरोप पाकिस्तानमधील एका महिलेने केला आहे. पीडित मुलींचे वय १५ वर्षे आणि १७ वर्षे असे सांगितले गेले आहे. या मुलींचे ११ जणांनी एकत्र अपहरण केले होते. दोन्ही मुलींना फैसलाबादच्या परिसरात ठेवण्यात आले होते. या घटनेसंदर्भात पाकिस्तानमधील लोकांचा रोष वाढला आहे. त्याचबरोबर आरोपीच्या अटकेची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

जिओ टीव्हीच्या अहवालानुसार १५ जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलींना सहा दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित मुलींच्या आईचे म्हणणे आहे की ११ सप्टेंबर रोजी त्यांच्या मुलींचे अपहरण झाले होते. आई म्हणाली की आरोपी मुलींना मादक पदार्थ देऊन नशेत ठेवत होते.

आरोपींनी पीडित मुलींचे आक्षेपार्ह छायाचित्रे आणि व्हिडिओही रेकॉर्ड केले. एफआयआरनुसार, १५ वर्षांची मुलगी फैसलाबादच्या जंग बाजार येथे घटनेनंतर सोडण्यात आली, तर तिच्या बहिणीला गुजराणवाला येथे सोडण्यात आले. पीडित मुलींच्या आईने सांगितले की, आरोपीने असा विचार केला होता की गरिबीमुळे पीडितेचे कुटुंब कोणतीही कायदेशीर कार्यवाही करणार नाही. तसेच भीतीपोटी राहते घर देखील सोडून जातील. आईने सांगितले की, घटनेनंतरही आरोपींनी मुलींचा पाठलाग केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version