हृदयविकाराचा झटका आलाय…हे करा उपाय

32

मुंबई : सध्या धावळीच्या युगात हृदयविकार होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. तरुणांमध्ये देखील हृदयविकार येण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळ आपण हृदयविकाराचा झटका येताच त्वरीत कोणते उपाय करायचे. हे उपाय केल्याने रुग्णाचा जीव वाचू शकतो.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णाला मळमळ होते. अशावेळेस त्या रुग्णाला एका कडेवर वळवा. असं केल्याने त्याला मोकळा श्वास घेता आल्याने त्याची तिव्रता कमी होते. तसंच फुप्फुसांना नुकसान होत नाही.

याशिवाय रुग्णाच्या मानेजवळ हात ठेवून त्याचा पल्स रेट चेक करा. जर तो ६० ते ७० पेक्षा जास्त असेल तर रक्तदाब झपाट्याने वाढतोय आणि रुग्णाची प्रकृती नाजूक आहे असं समजून तात्काळ रुग्णालयात हलवा. पल्स रेट कमी जास्त होत असेल तर रुग्णाला झोपवून त्याचे पायवर उचला. यामुळे पायाकडचा रक्तप्रवाह त्याच्या हृदयाकडे वळतो. असं केल्याने त्याला बऱ्यापैकी आराम मिळतो.

रुग्णाला झोपवल्यानंतर त्याचे कपडे जरा सैल करा. अशा परिस्थितीत त्याला जास्त हालचाल करायला लावू नये. रुग्णाने गाडी चालवता कामा नये, तसंच जिने चढणं-उतरणं टाळावं. तसेच असं झाल्यानंतर रुग्णाभोवती जास्त गर्दी करू होणार नाही याची काळजी घ्या.