मुंबई : बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेता हृतिक रोशनचा ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष २०१९’ च्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
ब्रिटनच्या ‘इस्टर्न आय’ या मॅगझिनने ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुषा’च्या नावासाठी ऑनलाइन पोल घेतला होता.
यामध्ये बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला गेल्या दहा वर्षांमधील सर्वाधिक मते मिळाली आहेत. हा मान मिळवल्यानंतर हृतिकने सोशल मीडिया पोस्टद्वारे सर्वांचे आभार मानले आहेत.
यावेळी हृतिक म्हणाला की, मला दिलेल्या मतांसाठी आभार. एखाद्या व्यक्तीचे दिसणे हीच खरी परीक्षा नसून त्याने आयुष्यात काय मिळवले तसेच त्याचा जीवनप्रवास कसा होता हे मी बघतो.
दरम्यान, हृतिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेल्याने सोशल मीडियावरून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.