एचएससी इंग्रजी पेपर सोपा; विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावला!

23

पुणे १२ फेब्रुवारी २०२५ : एचएससी १२वीच्या परीक्षेला काल सुरूवात झाली आणि पहिला पेपर इंग्रजीचा होता. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास दिसून आला. अनेक विद्यार्थ्यांनी पेपर सोपा आणि अपेक्षेपेक्षा सरळ गेल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, पेपर वेळेत पूर्ण करता आला आणि अभ्यास केलेल्या भागावर आधारित प्रश्न आले. त्यामुळे आई-वडिलांनाही दिलासा मिळाला आणि समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. परीक्षा म्हटली की टेंन्शन येतेच, पण या विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन परीक्षेला सामोरे जाण्याचा आदर्श घालून दिला.

अर्थात, पेपर सोपा की कठीण, हे निकालानंतरच कळेल. पण विद्यार्थ्यांमधला हा जोश पाहून पालक, शिक्षक आणि समाजातील सर्वांनाच आनंद होत आहे. परीक्षेच्या दडपणातही त्यांनी सकारात्मक वातावरण निर्माण केले आहे, ही खरोखर कौतुकास्पद बाब आहे. आता पुढील पेपरसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा!

न्युज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा