टेस्ट क्रिकेट मध्ये वेस्ट इंडिज आशियामधील सर्वात मोठे लक्ष गाठणारा संघ

बांगलादेश, ८ फेब्रुवरी २०२१: वेस्ट इंडीजने बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात इतिहास रचला. बांगलादेशच्या चटगांव येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्यांनी ३९५ धावांचे लक्ष्य गाठले आणि अनेक विक्रम आपल्या नावे केले. आशियामधील सर्वात मोठे लक्ष गाठणारा हा संघ बनला आहे. या व्यतिरिक्त त्यांनी आत्तापर्यंतचे पाचवे सर्वात मोठे लक्ष्यही गाठले आहे.

वेस्ट इंडिजच्या या विजयाचा नायक काइल मेयर्स होता. त्याच्या पहिल्या कसोटीत त्याने नाबाद दुहेरी शतक झळकावत वेस्ट इंडीजला तीन विकेट्सने जबरदस्त विजय मिळवून दिला. मेयर्सने नाबाद २१० धावा फटकावल्या. त्याने ३१० चेंडूत नाबाद खेळीत २० चौकार आणि ७ षटकार लगावले. पहिल्या डावात ४० धावा करणाऱ्या मीयर्सने सामन्यात एकूण २५० धावा केल्या. वेस्ट इंडीजकडून पदार्पण सामन्यात तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.

इतकेच नव्हे तर चौथ्या विकेटसाठी त्याने नुक्रमाह बोनार (८६) सह २१६ धावांची भागीदारी केली. १९८४ नंतर वेस्ट इंडीजची कोणत्याही विकेटसाठीची ही चौथ्या खेळी साठी सर्वात मोठी भागीदारी होती. चौथ्या डावात दुहेरी शतक ठोकणारा मीअर्स हा जगातील सहावा खेळाडू आहे. याशिवाय कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा