गोल पोस्ट राजकारण ‘हम बुरे ही ठीक हैं : संजय राऊत

‘हम बुरे ही ठीक हैं : संजय राऊत

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘हम बुरे ही ठीक हैं’ असं म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे. राज्यात सरकार स्थापनेचा तिढा सुटण्याचा मार्ग अजूनही मोकळा झालेला नाही. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता व यानिमित्ताने काल काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात बैठक ही झाली होती. या सगळ्या घडामोडी मध्ये आज संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.
बुधवारी रात्री काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं चर्चासत्र सुरू असतानाच संजय राऊत यांनी गोड बातमी लवकरच येणार असल्याचं म्हटलं होतं. तर आता पेढ्यांची ऑर्डर देण्यासही हरकत नसल्याचं ते म्हणाले होते. त्यानंतर आज त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर निशाणा साधला. ‘हम बुरे ही ठीक है, जब अच्छे थे तब कौनसा मेडल मिल गया था… !!’ असं ट्विट करत त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version