जालना तालुक्यातील सोनदेव येथे एकादशीच्या फराळातून शेकडो भक्तांना विषबाधा

26

जालना, ७ एप्रिल २०२४ : जालना तालुक्यातील सोनदेव येथे ५ एप्रिलला १० वाजेच्या सुमारास एकादशीच्या फराळातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यात सुमारे २५० लोकांना विषबाधा झाल्याने त्यांच्यावर गावातच उपचार करण्यात आले. त्यातील २०० जण बरे झाले असून उर्वरित ५० जणांवर अजूनही उपचार सुरु आहे. त्यातील काही रुग्णांना सेवली तर काही रुग्णांना नेरच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आल आहे

जालना तालुक्यातील सोनदेव येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरु असून काल एकादशीच्या दिवशी सर्वांसाठी भगरीचे फराळ करण्यात आले होते. रात्री ७ वाजेच्या सुमारास सर्वांनी फराळ केला आणि किर्तनाला बसले. किर्तन संपत आलं तस भक्तांना चक्कर, उलट्या, मळमळ सुरु झाली. त्यानंतर काही वेळेतच सुमारे २५० जणांना हा त्रास जाणवू लागल्याने भगरीच्या फराळातून विषबाधा झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे गावातील काही नागरीकांनी तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी यांना फोनवरुन माहिती दिली. त्यानंतर आरोग्य विभागाच्या यंत्रणेने तात्काळ दखल घेत गावातच उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा