पतीने पत्नीकडं नांदायला जावं, अहमदनगरच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

अहमदनगर, दिनांक १४ सप्टेंबर २०२२ : समाजामध्ये पती-पत्नीचे वाद होतात ही नवीन गोष्ट नाही. अनेक ठिकाणी पती-पत्नी वादाच्या वेगवेगळ्या घटना आजपर्यंत आपण पाहिल्या आहेत. आणि त्याचे न्यायालयाने दिलेले निकालही पाहिले. परंतु अहमदनगर येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने एका प्रकरणामध्ये निकाल देताना चक्क पतीने पत्नीकडे नांदायला जाण्याचा निकाल दिला आहे.

अहमदनगर येथील उच्चशिक्षित पती-पत्नीमध्ये वाद होता. यामधील एक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये कार्यरत आहे आणि दुसरा राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये नोकरीवर कार्यरत आहे. आठ वर्षांपूर्वी या दोघांचा विवाह झाला आहे. अहमदनगरच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयानं एक ऐतिहासिक निकाल दिलाय. यामध्ये पतीला न्यायालयाने थेट पत्नीकडे नांदायला पाठवण्याचा निर्णय दिलाय.

या जोडप्याचा विवाह २०१४ मध्ये झाला. लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांना एक आपत्य झाले. पुढे दोघांचेही नोकरीचे ठिकाण वेगवेगळ्या ठिकाणी असल्या मुळे दोघांची सतत धावपळ होत होती. अशात मुलाचा सांभाळ करून नोकरी करताना दोघांच्या मध्ये वाद सुरू झाले. या वादामुळे पत्नीने आपल्या कामाच्या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला. पतीची बदली होऊ शकते परंतु स्वतःची बदली होऊ शकत नसल्याने, पतीने बदली करून घेऊन आपल्याकडे राहायला यावे अशी तिने पतीकडे मागणी केली होती.

हे सुरू असतानाच सासरच्या मंडळी कडून आपला छळ होत असल्याचा आरोपही पत्नीने केला. यावरुन पुन्हा दोघांमध्ये वाद झाले. यानंतर पुढे पतीने पत्नीला घटस्फोटासाठी नोटीस पाठवली. ही नोटीस आल्याने पत्नीला सुरुवातीला धक्का बसला. परंतु संसार वाचवण्यासाठी पत्नीने न्यायालयीन लढा लढवण्याचे ठरवले आणि आपल्या वकीलाकडून न्यायालयात धाव घेतली. पत्नीच्या वतीनं वकील भगवान कुंभकर्ण आणि शिवाजी सांगळे यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा