पतीला झाला कोरोना…पत्नी पळाली माहेरी

बंगरुळ : सध्या विविध देशांमध्ये करोनाने शिरकाव केल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. त्यातच एक नवीन घटना समोर आली आहे. बंगळुरूहून एक नवविवाहित महिला पतीला करोनाची लागण झाल्याचे समजताच त्याला सोडून ती आपला जीव वाचवण्यासाठी तिच्या माहेरी पळून आली आहे. पण तिच्या या कृत्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात आल्याची शक्यता आहे.
ही महिला आपल्या पतीसोबत इटलीला हनिमूनला गेली होती. तिथून परतल्यानंतर पती करोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या महिलेला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. मात्र ती तिथून पळाली. ती विमानाने दिल्ली आणि नंतर रेल्वेने आग्रा येथील आपल्या माहेरी आली. आरोग्य विभागाला या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर वेगवान हालचाली करून या महिलेचा प्रवास मार्ग शोधण्यात येत आहे. या महिलेच्या पतीला करोनाचे निदान झाले होते.

यानंतर महिलेला वेगळे करण्यात आले होते. मात्र, ही महिला ८ मार्चला बंगळुरूहून दिल्ली आणि नंतर आग्र्याला आपल्या पालकांकडे परतली. यानंतर जेव्हा आरोग्य विभागाचे अधिकारी तिच्या घरी पोहोचले, तेव्हा ती तेथे ८ सदस्यांसोबत राहत असल्याचे आढळून आले. यानंतर आरोग्य अधिकार्‍यांनी या सर्वांनाच वेगळे राहायला सांगितले. मात्र त्यांनी नकार दिला.
यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलिसांना बोलवावून त्यांना वेगळे करण्यात आले.

याबाबत आग्रा येथील सीएमओ मुकेश कुमार वत्स यांनी अशी माहिती दिली की, आरोग्य अधिकाऱ्यांचे पथक महिलेच्या घरी गेले होते. तेव्हा तिच्या वडिलांनी ती बंगळुरूला परत गेली, अशी खोटी माहिती दिली. यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी हस्तक्षेप करून तिच्या संपूर्ण कुटुंबाला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. या महिलेला आता एसएन वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

फेब्रुवारी महिन्यात या महिलेचा विवाह झाला होता. यानंर ती तिच्या पतीसोबत हनिमूनसाठी इटलीला गेली होती. तेथून ते दोघे ग्रीस आणि फ्रान्सलाही गेले. यानंर ते २७ फेब्रुवारीला मुंबईला आले आणि येथून बंगळुरूला गेले. ७ मार्चला या महिलेच्या पतीला करोना झाल्याचे निष्पन्न झाले. यानतंर या दोघांनाही वेगळे ठेवण्यात आले होते. ही गोष्ट या महिलेने आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यावर तिच्या वडिलांनी तिला आग्र्याला बोलावून घेतले होते. या प्रवासादरम्यान तिच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही करोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अलिगड वैद्यकीय महाविद्यालयाने संबंधित महिला संशयित असल्याचे म्हटले होते. या महिलेच्या रक्ताचे नमुने पुण्याच्या लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती एका डॉक्टरने दिली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा