हैदराबाद: तेलंगणाच्या हैदराबादमध्ये बलात्काराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. येथील चंद्रयानगुट्टा पोलीस ठाण्यात एका ऑटो चालकाद्वारे एका १८ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलगी तिच्या लहान बहिणीसोबत आजीच्या घरी जात असताना हा प्रकार घ़डला होता. त्यावेळी रस्ता विसरल्यानंतर आरोपीच्या भावाने त्या दोन मुलींना पाहिलं. रिक्षाचालक असलेल्या आरोपीच्या भावाने त्या दोन्ही मुलींना घेऊन स्वत:च्या घरी पोहोचला. तेव्हा त्याच्या आईने मुलींना घरी सोडण्यासाठी लहान भावाला पाठवलं. तेव्हा त्याने मुलींना घरी घेऊन न जाता परिसरातील एका लॉजवर नेलं. लहान मुलगी झोपताच मोठ्या बहिणीवर नराधमाने बलात्कार केला. त्यानंतर रेल्वे स्थानकावर त्या दोघींना सोडून तो फरार झाला. त्यानंतर पीडित मुलीने तिच्या कुटुंबियांना फोन केला. कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दोन्ही भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फरार अरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.