Hyundai ची सनरूफ असलेली सर्वात स्वस्त कार, आज होणार लॉन्च

New Hyundai Venue, ६ सप्टेंबर २०२२: दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी Hyundai आपली लोकप्रिय कार Venue N line एका नवीन शैलीत सादर करणार आहे. कंपनी आज (६ सप्टेंबर) भारतीय बाजारपेठेत नवीन Venue N line लाँच करणार आहे. i20 N लाईनप्रमाणेच आगामी Venue N Line देखील कंपनी काही कॉस्मेटिक बदलांसह आणत आहे. ट्वीड सस्पेंशन आणि एक्झॉस्ट सेटअप व्हेन्यू एन लाइनमध्ये उपलब्ध असेल. कंपनीने नवीन Venue N line ची प्री-बुकिंग सुरू केली आहे.

ही आहे बुकिंग रक्कम

२१,००० रुपयांच्या टोकन रकमेसाठी नवीन Venue N line ऑनलाइन बुक केली जाऊ शकते. कंपनीने म्हटले आहे की नवीन व्हेन्यू एन लाइन मेटाव्हर्सवर लॉन्च केली जाईल. नवीन व्हेन्यू एन लाइन देशांतर्गत बाजारपेठेतील प्रवासी कार विभागातील मारुती सुझुकी ब्रेझा, टाटा नेक्सॉन, किआ सोनेट आणि महिंद्रा XUV300 यांच्याशी स्पर्धा करेल. कंपनीने व्हेन्यू एन लाईनला स्पोर्टी लूक दिला आहे.

२०२२ वेन्यू एन लाईनमध्ये नवीन ग्रिल, नवीन अलॉय व्हील, ड्युअल-टिप एक्झॉस्ट यांसारखे कॉस्मेटिक अपग्रेड दिसू शकतात. ‘एन लाइन’ बॅज कारच्या पुढील फेंडर, टेलगेट आणि ग्रिलवर देखील दिसू शकतो. नवीन Venue N line सध्याच्या मॉडेलपेक्षा थोडे वेगळे असेल. त्याचे इंटीरियर देखील अधिक प्रीमियम असेल. नवीन Hyundai Venue N लाइन N6 आणि N8 या दोन व्हेरियंट मध्ये लॉन्च केली जाईल.

मिळतील ही फीचर्स

नवीन व्हेन्यूच्या टॉप मॉडेलमध्ये Apple CarPlay आणि Android Auto सह ८-इंच टचस्क्रीन, कनेक्टेड कार टेक, बोस साउंड सिस्टम, पॉवर-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि कॉर्नरिंग लॅम्प यांसारखी फीचर्स मिळतील. असे मानले जाते की नवीन Venue N लाईनला DCT आणि iMT वर्जन मध्ये 1.0 टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल.

तथापि, स्टॅंडर्ड Venue N line मध्ये 1.2L पेट्रोल आणि 1.5L डिझेल इंजिन पर्यायांसह ऑफर केले जाईल. Venue N line ७-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येऊ शकते. नवीन Venue N line केबिनच्या आत ऑल-ब्लॅक थीम दिसेल, जी ती Venue च्या नियमित व्हेरिएंटपेक्षा वेगळी बनवते.

इलेक्ट्रिक सनरूफ मिळेल

Hyundai ची नवीन Venue N line इलेक्ट्रिक सनरूफसह येईल आणि त्यात ऑल-व्हील डिस्क ब्रेकसह ३० सेफ्टी फीचर्स देखील असतील. याशिवाय या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये नॉर्मल, इको आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड उपलब्ध असतील. कंपनी आज दुपारी १२ च्या सुमारास लॉन्च करणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा