मुंबई, २३ मे २०२३ : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी, राष्ट्रीय पातळीवर विरोधकांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राष्ट्रीय पातळीवर राजकारणात चांगली पकड आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांचे नाव चर्चेत होते.
परंतु प्रत्यक्षात शरद पवार यांनी आपण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता आगामी काळात लोकसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. यामुळे शरद पवार यांचे नाव आता पंतप्रधान पदासाठी घेतले जातंय, मात्र पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचेही पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
सध्या देश पातळीवर लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, विरोधकांकडून लोकसभेच्या निवडणूकीसाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. यामध्ये राष्ट्रीय स्तरावर सर्वच पक्षांमध्ये सलोख्याचे संबंध असणारे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील सक्रीय भूमिका बजावताना दिसत आहेत. अशातच त्यांच्या नावाची चर्चा राष्ट्रपती पदासाठी होऊ लागली. यावर आता शरद पवार यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – खळदकर