करंजवण पाणीयोजनेला बाळासाहेबांचे नाव दिल्यामुळे मी सुहास कांदेंचा आभारी आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मनमाड, १४ फेब्रुवारी २०२३ : आमदार सुहास कांदे यांनी कंरजवण पाणीपुरवठा योजनेला बाळासाहेबांचे नाव दिल्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. आम्ही एल्गार पुकारला तेव्हा सुहास कांदे माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते आणि ते माझे विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळे मनमाडबरोबरच नांदगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आणि मनमाडकरांना लवकरात लवकर पाणी मिळेल, असे एकनाथ शिंदेनी सांगितले.

नगरपरिषदेच्या नवीन इमारतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याबरोबरच एमआयडीसी आणि ट्रॉमा केअर सेंटरचीही घोषणा त्यांनी केली. शहरातील भगवान वाल्मीकी स्टेडियमवर ३११ कोटींच्या स्व. बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

यावेळी मंचावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला तुफान गर्दी लोटली होती. स्टेडियमवर अनेक मोठ्या नेत्यांची सभा झाली; मात्र आजपर्यंत स्टेडियम कधीच भरले नव्हते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा