मुंबई, २ जुलै २०२३: राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही मोठी फूट पडली असुन राष्ट्रवादीचे नेते आणि आत्ताचे विद्यमान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकार बरोबर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीय.
त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांपैकी जवळपास ४० आमदारांचा पाठिंबा अजित पवार यांच्या कडे असल्याचे बोललं जातंय. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ आमदार यांनी ही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे त्यामध्ये दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, धर्मरावबाबा अत्राम, अनिल भाई दास पाटील यांचा समावेश आहे
न्युज अनकट प्रतिनिधी : अंकुश जाधव