मुंबई, 30 जून 2022: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दहा दिवसापासून जनतेने अनेक उलथापालथ झालेली पाहिली. आजही अशीच काहीशी गोष्ट घडताना दिसली. प्रेस कॉन्फरन्स मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आपण मंत्रिमंडळात सामील होणार नसल्याचं जाहीर केलं होतं. मात्र शपथविधीच्या काही काळ अगोदरच उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं समोर आलं. आज दोन्हीही नेत्यांनी आपल्या पदाच्या शपथा घेतल्या आहेत.
राज्यपाल कोषारी यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आपण मंत्रिमंडळात सामील होणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र हाय कमांड कडून आलेल्या निर्देशानंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनणार असल्याची माहिती समोर आली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे