“मला गर्लफ्रेंडला भेटायचंय”,मग मी कोणतं स्टीकर लावू……

मुंबई, २४ एप्रिल २०२१: सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्यामुळं सरकारनं महाराष्ट्रात कडक लाॅकडाऊनची घोषणा केलीय आणि संपूर्ण जनतेला या लाॅकडाऊनचं पालन करण्याचं आव्हान करत आहे. मात्र, अश्या परिस्थितीमधे अनेक नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे आणि असाच एक प्रकार समोर आला आहे.

मुंबईमधे सध्या वाहनांसाठी कलर स्टीकर बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, एकानं “मला गर्लफ्रेंडला भेटायचंय”,मग मी कोणतं स्टीकर लावू “,असा प्रश्न मुंबई पोलिसांना ट्विटरवर केलाय. यावरच मुंबई पोलिसांनी खूप सुंदर उत्तर त्या तरूणाला दिलं जे सध्या प्रचंड व्हायरल होतंय.

“आम्हाला माहितीय की गर्लफ्रेंडला भेटणं तुम्हाला आवश्यक आहे. मात्र, हे आमच्या साठी अत्यावश्यक सेवेमधे येत नाही. दुरव्यानं प्रेम घट्ट होतं. तुम्ही आयुष्यभर एकत्र राहवं यासाठी शुभेच्छा देत आहोत. हा फक्त एक टप्पा आहे.” असं उत्तर दिलं आहे.

राज्यात सध्या कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्यात महाराष्ट्र पोलिस देखील आपलं सर्वस्व पणाला लावून जनतेला अवाहन करत आहेत. तसेच या कठीण काळात सरकार आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करून कोरोनाला आटोक्यात आणण्याचं काम आपण नक्कीच करू शकतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा