गोल पोस्ट गोल पोस्ट “मी एक ड्रग्स व्यसनी होते” कंगणाचा व्हिडिओ व्हायरल…

“मी एक ड्रग्स व्यसनी होते” कंगणाचा व्हिडिओ व्हायरल…

मुंबई, १३ सप्टेंबर २०२०: अभिनेत्री कंगना रनौतनं ड्रगच्या वादातून अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सुशांत प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यापासून कंगनानं संपूर्ण बॉलिवूडला आपल्या निशाण्यावर घेतलं आहे. अभिनेत्रीने असं ही म्हंटलं आहे की ९० टक्के सेलेब्रिटी हे ड्रग व्यसनी आहेत आणि प्रत्येकजण ड्रग पार्ट्यांमध्ये भाग घेतो. कंगनाच्या या वक्तव्यांमुळं बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आणि नवी चर्चा सुरू झाली. पण आता स्वत: कंगना रनौतही या वादात अडकली आहे.

कंगनानं कबूल केलं की ती एक ड्रग व्यसनी होती

कंगना रनौतचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये कंगना रनौत हे कबूल करत आहे की एकेकाळी ती ड्रगची व्यसनाधीन झाली होती. तिचं हे वक्तव्य तिच्यासाठी आणखी एक वाद निर्माण करण्यासाठी खूप आहे. संपूर्ण बॉलिवूडला ड्रग्ज वादावरून सतत घेरण्याचा प्रयत्न करणारी अभिनेत्री आणि नंतर एका व्हिडिओ मध्ये स्वतःच कबुल करणं की मी सुद्धा ड्रग्स व्यसनी होते, ही आश्चर्यात टाकणारी गोष्ट आहे.
त्या व्हिडिओमध्ये कंगना म्हणत आहे – मी वयाच्या फक्त १५ व्या वर्षी घर सोडून पळून गेले होते. नंतर दीड दोन वर्षातच एक चित्रपट अभिनेत्री बनले. पण, माझ्या सुरुवातीच्या वर्षांत मी एक ड्रग्स व्यसनी होते. माझ्या आयुष्यात अनेक वाईट घटना घडल्या. मी सुरुवातीला अश्या लोकांमध्ये मिसळले ज्यामुळं मी अडचणीत सापडत गेले. आता कंगनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यावर बरेच लोक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

बॉलिवूड प्रतिक्रिया देईल का?

तसं, हे माहित आहे की कंगनानं यापूर्वी सांगितलं होतं की ती ज्या पार्ट्यांमध्ये गेली होती तिथं ड्रग्स वापरलं जात होतं. तीनं असं ही सांगितलं होतं की, या पार्ट्यांमध्ये कोकिन जास्त वापरलं जातं. पण, आता त्या वक्तव्यांमधील कंगनाचा हा जुना व्हिडिओ अनेक प्रश्न उपस्थित करीत आहे. या व्हिडिओवर बॉलिवूड सेलेब्स आता प्रतिक्रिया देतात की नाही हे पाहण्यासारखं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version