मी बेरोजगारी संपवणार, राहुल गांधी यांचं गुजरात सभेत आश्वासन

अहमदाबाद, ५ सप्टेंबर २०२२ : गुजरात मधील अहमदाबाद मध्ये झालेल्या सभेत भाजपा वर जोरदार हल्लाबोल केला आहे.राहुल गांधी सभेत बोलतात की सरदार पटेल हे शेतकऱ्यांचा आवाज होते. आज त्यांचा पुतळा सर्वात उंच आहे. हा भाजपाने उभारला आहे. तरी देखिल दुसरीकडे सरदार ज्यांच्या साठी लढायचे आज त्यांच्या विरोधात केंद्र सरकार कामे करत आहे. पुढे राहुल गांधी म्हणाले, गुजरात मध्ये काँग्रेस सरकार आले तर शेतकऱ्याचे ३लाख रुपये पर्यंत कर्ज माफ करू,

गुजरात तर आत्ता ड्रग सेंटर बनले आहे. मुंद्रा बंदरातून आम्ली पदार्थ नेले आणले जाते. पण सरकार त्याच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. हे गुजरात मॉडेल आहे. गुजरात हे असे राज्य आहे की, जिथे आंदोलन करण्यापूर्वी ज्यांच्या विरोधात आंदोलन करणार आहेत त्यांची परवानगी घ्यावी लागत आहे.

राहुल गांधी यांचं आश्वासन!

राहुल गांधी म्हणाले की,काँग्रेसची सत्ता येताच १००० रुपयांचा गॅस सिलिंडर ५०० रुपयांना मिळणार असल्याचे ते म्हणाले. भाजप सरकारने बंद केलेल्या शाळा पुन्हा चालू करण्याचे अश्वासन दिले आणि कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची भरपाई देणार आणि आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ.

याशिवाय सर्वसामान्य ग्राहकांना ३०० युनिट मोफत वीज देऊ. आणि ३००० इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडण्याची आणि मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणाही काँग्रेस नेत्याने केली आहे. तसेच कॉंग्रेस सत्तेवर आल्यास दूध उत्पादकांना ५ रुपये अनुदान देणार तसेच मला गुजरात मधील बेरोजगारी संपवायची आहे, त्यामुळे आम्ही आमचा कॉग्रेस पक्ष १० लाख तरूणांना रोजगार देणार असल्याचेही म्हंटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा