मुंबई, २३ मे २०२३: महाराष्ट्रात बॉम्बस्फोटाच्या धमकीची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. यावेळी मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलला टॅग करून धमकीची पोस्ट टाकण्यात आली आहे. पोस्टमध्ये आरोपीने लिहिले की, “मी लवकरच मुंबईत स्फोट घडवणार आहे”. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही पोस्ट २२ मे रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया टीमने ही पोस्ट पाहताच संबंधित पोलिस ठाण्याला कळवण्यात आले. पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. ज्या ट्विटर हँडलवरून हे पोस्ट करण्यात आले आहे त्याचीही चौकशी करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात अशा धमक्यांची ही काही नवीन घटना नाही. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान, १० एप्रिल रोजी महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षात एका व्यक्तीने फोन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. मी एकनाथ शिंदे यांना उडवून देईन, असे त्या व्यक्तीने फोनवर सांगितले. त्यामुळे मुंबई पोलीस अत्यंत सतर्क आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड