कोलकाता, २२ सप्टेंबर २०२०: तृणमूल काँग्रेसच्या खासरदार नुसरत जहाँ एका व्हिडीओ चॅट ऍपवर चांगल्याच भडकल्या आहेत. फॅन्सी यू नावाच्या एका व्हिडीओ चॅट ऍपनं ऍपच्या जाहिरातीसाठी नुसरत जहाँ यांचा फोटो वापरला, मात्र यासाठी त्यांनी नुसरत जहाँ यांची परवानगी घेतली नाही त्यामुळे खासदार नुसरत जहाँ चांगल्याच भडकल्या असून ते या कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.
नुसरत जहाँ यांनी ट्विट करत कोलकाताचे पोलीस आयुक्त आनुज शर्मा यांना टॅग केलं आहे. ट्विटमध्ये नुसरत जहाँ यांनी जाहिरातीचा स्क्रिन शॉट शेअर केला आहे. हा स्क्रीनशॉर्ट शेअर करत आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.
नुसरत जहाँ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “परवानगी न घेता फोटो वापरला जाऊ शकत नाही. कोलकाता पोलिसांच्या सायबर सेलकडे या प्रकरणात लक्ष देण्याची विनंती करते. कायदेशीर कारवाई करण्यासाठी आपण तयार आहोत”. दरम्यान एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सायबर सेलने याप्रकरणी तपास सुरु केला असल्याचं सांगितलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे