ICC FTP Team India Matches, १८ ऑगस्ट २०२२: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आपला भविष्यातील कार्यक्रम जाहीर केला असून यावेळी अनेक आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत. २०२३ ते २०२७ या वर्षासाठी जारी केलेल्या योजनेत भारतीय संघ 138 द्विपक्षीय सामने खेळणार आहे, याशिवाय ICC स्पर्धांच्या सामन्यांचाही समावेश आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या भविष्यातील प्लॅनमध्ये १२ कायमस्वरूपी देशांचे सामने जाहीर करण्यात आले आहेत. २०२३ ते २०२७ या कालावधीत एकूण ७७७ आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातील. यामध्ये १७३ कसोटी सामने, २८१ एकदिवसीय सामने आणि ३२३ टी-२० सामन्यांचा समावेश आहे. २०२२ मध्ये संपलेल्या सायकलमध्ये एकूण ६९४ सामने खेळले गेले.
हे असंल भारतीय संघाचं वेळापत्रक
जर आपण टीम इंडियाच्या वेळापत्रकाबद्दल बोललो, तर या संपूर्ण टाइमलाइनमध्ये भारत ३८ कसोटी सामने, ३९ एकदिवसीय आणि ६१ टी-२० सामने खेळणार आहे. टीम इंडियाचं संपूर्ण लक्ष टी-२० क्रिकेट खेळण्यावर असल्याचे स्पष्ट झालं आहे, तर वनडेमध्ये सर्वाधिक सामने तिरंगी मालिकेत होणार आहेत. विशेष म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये आता ४ ऐवजी ५ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. या वेळापत्रकात टीम इंडिया इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५-५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे, तर टी-२० मालिकाही होणार आहे.
२०२३-२०२७ या वर्षांमधील भारतीय संघाच्या प्रमुख दौऱ्यांमध्ये जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये वेस्ट इंडिजचा दौरा समाविष्ट आहे. येथे टीम इंडियाला २ कसोटी, २ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळायचे आहेत. भारताला जानेवारी-मार्च २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. ऑस्ट्रेलिया २०२३ च्या सुरुवातीला चार सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात येत आहे, परंतु त्यानंतर २०२४-२५ मध्ये जेव्हा भारतीय संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचेल. सप्टेंबर २०२४ मध्ये बांगलादेशचा संघ २ कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे.
झिम्बाब्वे मालिकेचा समावेश केल्यास २०२३ च्या ५० षटकांच्या विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला एकूण २७ एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. यामध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेचा, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या घरच्या मालिकेचा आणि न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेचा समावेश आहे.
यावेळी होत आहेत अधिक सामने
आयसीसीच्या पूर्ण वेळापत्रकावर नजर टाकली तर २०१९-२३ च्या वेळापत्रकापेक्षा यावेळी बरेच सामने आहेत. २०१९-२३ दरम्यान १५१ कसोटी, २४१ एकदिवसीय आणि ३०१ टी-२० सामने खेळले गेले आहेत. तर २०२३-२७ दरम्यान १७३ कसोटी, २८१ एकदिवसीय आणि ३२६ टी-२० सामने खेळवले जातील. या सर्वांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५, २०२७ यांचा समावेश आहे.
जर आपण संघांवर नजर टाकली तर बांगलादेश २०२३-२७ मध्ये सर्वाधिक सामने खेळेल जे १५० असतील, त्यानंतर वेस्ट इंडिज (१४७), इंग्लंड (१४२), भारत (१४१), न्यूझीलंड (१३५), ऑस्ट्रेलिया (१३२) असतील. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड (४३), ऑस्ट्रेलिया (४०) आणि भारत (३८) सामने खेळत आहेत. बांगलादेश (५९), श्रीलंका (५२) आणि आयर्लंड (५१) हे संघ वनडेत अव्वल आहेत, भारत ४२ वनडे खेळणार आहे. T20 मध्ये वेस्ट इंडिज (७३), भारत (६१) आणि बांगलादेश (५७) T20 सामने खेळणार आहेत आणि हे तिघे टॉपवर आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे