आयसीसी टी-२० रँकिंग; बाबर आझमला मागे टाकत डेव्हिड मलान प्रथम स्थानी

९ सप्टेंबर, २०२०: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय श्रृंखला संपली आहे. या श्रृंखलेच्या समाप्तीनंतर आईसीसी टी-२० रॅंकिंग मध्ये काही नवीन बदल पाहायला मिळाले आहेत.
याआधी पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम हा प्रथम स्थानी होता, परंतु नवीन आलेल्या आईसीसी टी-२० रॅंकिंग मध्ये बाबर आझमचे प्रथम स्थान इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलान याने मिळवले आहे. भारतीय संघाचा फलंदाज के. एल. राहुल याला ही रँकिंग मध्ये नुकसान झाले आहे. तो चौथ्या स्थानी आला आहे. तसेच भारताचा कर्णधार विराट कोहली याला मात्र फायदा झाला आहे. तो नवव्या स्थानी आला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या शृंखलेत डेव्हिड मालान याने ४३ च्या सरासरीने एकूण १२९ धावा केल्या. तसेच तो श्रृंखलेत सर्वोच्च धावा करणारा खेळाडू ठरला. तसेच ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार आरोन फिंच याने आपले तिसरे स्थान कायम ठेवले आहे.
न्यूझीलंड संघाचा फलंदाज कोलिन मुनरो हा पाचव्या स्थानी आला आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा ग्लेन मॅक्सवेल हा सहाव्या स्थानी पोहोचला आहे. दरम्यान तिसरा सामना हुकलेल्या ईओन मॉर्गन याला नुकसान झाले असून तो दहाव्या स्थानी जाऊन पोहोचला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा