नवी दिल्ली, २१ ऑक्टोंबर २०२०: इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च’नं (आयसीएमआर) प्लाझ्मा थेरपीबाबत मोठं विधान केलं आहे. आयसीएमआर’नं सांगितलं की ते नॅशनल हेल्थ क्लिनिकल प्रोटोकॉलमधून प्लाझ्मा थेरपी काढून टाकण्याचा विचार करीत आहेत. आयसीएमआर’नं मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, अनेक अभ्यासांपूर्वी असं म्हटलं आहे की मृत्यु दर कमी करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी फार प्रभावी नाही.
आयसीएमआर’नं यापूर्वी बर्याच वेळा प्लाझ्मा थेरपीवर प्रश्न उपस्थित केला आहे. अलीकडंच त्यांनी सांगितलं की, प्लाझ्मा थेरपीऐवजी कोरोनाच्या उपचारात अँटिसेरा’चा पर्याय म्हणून वापर केला जाऊ शकतो. आयसीएमआर’नं कोरोनावर उपचार करण्यासाठी प्राण्यांच्या रक्ताच्या सीरमचा वापर करून अत्यंत शुद्ध अँटीसेरा विकसित केल्याचा दावा केला आहे.
आयसीएमआर वैज्ञानिक डॉ. लोकेश शर्मा म्हणाले की, अँटिसेरा हे प्राण्यांचे रक्त सीरम आहे, ज्यामध्ये विशिष्ट प्रतिजैविकांच्या (ऑंटीजन) विरूद्ध प्रतिपिंडं (अँटीबॉडीज) असतात. ते विशिष्ट रोगांच्या उपचारांमध्ये वापरले जातात.
कोरोना काळात ठरला होता चर्चेचा विषय
कोरोना संकटाच्या वेळी प्लाझ्मा थेरपीवर बरीच चर्चेत होती. कोरोनामधून बरे झालेल्या रूग्णांच्या शरीरातून घेतलेला प्लाझ्मा कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या शरीरात सोडला जातो. ज्यामुळं रुग्णांच्या शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी प्रतिपिंडं तयार होतात. कोरोना विषाणूचा उपचार करण्यासाठी जगातील इतर अनेक देशांमध्ये प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे. भारताव्यतिरिक्त अमेरिका, स्पेन, दक्षिण कोरिया, इटली, तुर्की आणि चीनसह अनेक देशांमध्ये याचा वापर केला जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे