लातूर २२ फेब्रुवारी २०२४ : मराठवाड्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर डॉ.प्रमोद घुगे यांच्या आयकॉन सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलचे नव्या वास्तूत स्थलांतर झाले असून २५ फेब्रुवारी रोजी याचे शुभारंभ होणार आहे. आयकॉन हाॅस्पिटल किडनी ट्रान्सप्लांटची सेवा देणार असुन यामुळे मराठवाड्यातील रुग्णांचे किडनी बदलण्यासाठी वणवण फिरणे आता कायमस्वरूपी थांबणार आहे.
वैद्यकीय शिक्षण घेत असताना एम.बी.बी.एस. सह एम.डी. व डी.एम.नेफ्रॉलॉजीस्ट ई. पदव्या मिळवताना सातत्याने आपली उत्तीर्ण गुणवत्ता अबाधित ठेवत राज्य-देशपातळीवरील यादीत अगदी वरच्या टोकाचे क्रमांक मिळवत सुवर्णपदक मिळवलेल्या डॉ.प्रमोद घुगे यांना राज्यभरातीलच नव्हे, तर देशभरातील अनेक नामांकित मल्टीस्पेशलिटी-सुपरस्पेशलिटी आणि अन्य मोठ्या खाजगी रुग्णालयात मागेल त्या पॅकेजची ऑफर असतानाही डॉक्टरांनी त्या स्वीकारल्या नाहीत. केवळ अनुभव गाठीशी असावा म्हणून त्यांनी काही काळ पुणे येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलला आपल्या स्पेशल किडनी विषयात काम केले. हे काम करण्यापूर्वी आणि लातूरला येईपर्यंत तब्बल दोन हजार किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांच्या अनुभवाची शिदोरी गाठीशी घेऊन डॉ.घुगे जगाच्या पाठीवर कुठेही आपले विश्व निर्माण करू शकले असते. परंतु त्यांनी गरजवंत-सर्वसामान्य रुग्ण, माझी लोकच माझे विश्व म्हणून लातूरची निवड केली.
सन २०१४ मध्ये बार्शी रोडवरील दयानंद गेट जवळील तोडकर कॉम्प्लेक्स मध्ये आपल्या छोटेखानी रुग्णालयाने डॉ.घुगेनीं सुरुवात केली. एक दशक लातूर सह परिसरातील तीन-चार जिल्ह्यातील रुग्णांवरती अगदी मनापासून उपचार करून अनेकांचे आयुष्य वाढवले, तर कित्येकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढत जीवदान दिले. शिवाय अगदी तरुणपणातच किडनी सारख्या जर्जर आजाराने त्रस्त असलेल्या अनेक रुग्णांचे डायलिसीस बंद करणाऱ्या डॉ.प्रमोद घुगे यांची वैद्यकीय क्षेत्रातील यशोगाथा अनन्यसाधारण आहे.
डॉक्टर होईपर्यंत आणि डॉक्टर झाल्यावर सुद्धा मुळात पहेलवान असलेल्या या माणसाचे कुस्तीवरील वा खेळावरील प्रेम तसुभरही कमी झालेले नाही. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाचा उपचार करताना त्या रुग्णासह सोबतच्या नातेवाईकांना निर्व्यसनी-निरोगी राहाण्याचे फायदे समजून सांगण्याचे समुपदेशनाचे मोठे काम आजही डॉ.घुगे न चुकता करत आहेत.
अशा या हिमालयाच्या उंचीच्या, ज्ञानाने खचाखच भरलेल्या डॉ.घुगे यांचे आयकॉन हॉस्पिटल आता रुग्णांसाठी आयडॉल ठरत आहे. त्या माध्यमातून आरोग्यासंबंधित संपुर्ण सुविधा एकाच छताखाली मिळणार असल्याने आणि येणाऱ्या काळात “किडनी” बदलण्याचे काम आता येथेच होणार असल्याने रुग्णांची सर्वत्र फिरण्याची वणवण तर थांबणारच आहे. शिवाय त्यांचा वेळही वाचणार आहे.
न्युज अनकट प्रतिनीधी : सलीम शेख