सुशांतसिंगच्या मृतदेहाचा फोटो शेअर केल्यास सायबर सेल करणार कारवाई

मुंबई, दि. १५ जून २०२०: अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या निधनानंतर त्यांच्या मृतदेहाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या या फोटोमुळे सिनेसृष्टीतील कलाकार व तसेच सुशांतचे फॅन देखील असंतोष व्यक्त करत आहे. दरम्यान, महाराष्ट्र सायबर सेलनेही निषेध करत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र सायबर सेलने ट्विट केले की, सोशल मीडियावर एक चिंताजनक ट्रेंड दिसून येत आहे. दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचे चित्र शेअर केले जात आहे, जे विचलित करणारे आहे. पुढील ट्विटमध्ये महाराष्ट्र सायबरने लिहिले की, सोशल मीडियावर असे चित्र पसरवणे कायदेशीर मार्गदर्शक सूचना आणि कोर्टाच्या आदेशांच्या विरोधात आहे. असे केल्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

दुसर्‍या ट्विटमध्ये महाराष्ट्र सायबरने असे चित्र सामायिक करण्यास टाळावे असे निर्देश दिले आहेत. यापूर्वी सोशल मीडियावर पसरलेला फोटो काढून टाकण्यात यावा, असेही ते म्हणाले.

अभिनेता सुशांतसिंग राजपूतने रविवारी मुंबईच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येच्या बातमीनेही कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तसेच त्याच्या वयस्कर वडलांना देखील प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. मृत्युची बातमी कळताच ते बेशुद्ध देखील पडले होते. बॉलीवूड विश्वात निखिल या वर्षात अनेक धक्के बसले आहेत त्यात सुशांत सिंग राजपूतचा काल झालेला मृत्यूने त्यात आणखीन भर घातली आहे. बॉलीवूडने भविष्यातील सुपरस्टार काल गमावला.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा