एक कोणता तरी एक मार्ग पत्करून त्यावर काम करत राहिल्यास, एक दिवस यश नक्कीच मिळेल – अमिताभ बच्चन

पुणे, १९ ऑक्टोबर २०२० : जीवनात रोज चढ-उतार येतात, त्यातूनच झालेल्या चुकांमधून मी शिकत गेलो, त्यात सुधारणा करत गेलो. आजही कोणतेही काम करताना यात यशस्वी होणार का नाही याबाबत माझ्या मनात कायम अस्वस्थता असते.

मी ज्या माध्यम क्षेत्रात काम करतो, त्यात काम करणारे लोक आणि परिस्थिती यातूनच नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न मी करतो. त्यामुळे माणसाने कायम परिश्रम करत राहिले पाहिजे. एक कोणता तरी एक मार्ग पत्करून त्यावर काम करत राहिल्यास, एक दिवस यश नक्कीच मिळेल. असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आज पुण्यात केले.

पुण्यातील सिंबायोसिस संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित साहित्य महोत्सवाचा समारोप आज अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सिंबायोसिसचे संस्थापक समजदार डॉ. शां. ब. मुजुमदार उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा