पालघर घटनेप्रकरणी धार्मिक तेढ निर्माण केल्यास कारवाई होणार

पालघर-गड चिंचोली: महाराष्ट्रातील पालघरमध्ये गड चिंचोली गावात मॉब लिंचिंगच्या घटनेनंतर उद्धव सरकार निशाण्यावर आहे. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या विषयावर सरकारची भूमिका सर्वांसमोर ठेवली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांचे सरकार कोणत्याही दोषीला सोडणार नाही, लोकांनी हा विषय भडकवण्याचा प्रयत्न करू नये. सदर घटनेमध्ये जमावाने तीन व्यक्तींना मारहाण करून ठार केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी घटनेविषयी सांगितले की हे हिंदू-मुस्लिम सारखे प्रकरण नाही, मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही बोललो आहे. प्रत्येकाला हे समजावून सांगण्यात आले आहे की ही धर्माशी संबंधित कोणतीही गोष्ट नाही, परंतु जो कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आग लावण्याचा आणि प्रकरण भडकवण्याचा प्रयत्न करेल त्याने कठोर कारवाई केली जाईल.

पालघर येथे मोब लिंचींग मध्ये तीन जणांना ठार करण्यात आले. जमलेल्या जमावाला या तिघांवर चोरी केल्याचा संशय होता. यावेळी पोलिसही तेथे उभे होते, पण ते फक्त तमाशा पाहतच राहिले. या प्रकरणात राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे, १०० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर इतरांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उद्धव म्हणाले की, जेव्हा ते लोक सूरत ला जात होते तेव्हा त्यांना दादर-नगर हवेलीच्या सीमेवर रोखून परत पाठवले गेले. जर ते तिघेजण पोलिसांच्या सांगण्यावरून पुन्हा माघारी गेले असते तर ही घटना घडली नसती.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा