सरकार आल्यास गुजरात मधेही देणार मोफत वीज, केजरीवालांचे गुजरातच्या जनतेला आश्वासन

गुजरात, २१ जुलै २०२२; दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी गुजरात दौऱ्यावर गेले. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूकी पूर्वी आपल्या पक्षाकडून आश्वासन जाहीर केलं. ते म्हणाले की दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्याबरोबरच विजेच्या बिलामध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. आमच्या सरकारने दिल्लीत ज्या प्रमाणे मोफत वीज दिली आहे त्या प्रमाणे आम्ही पंजाबमध्ये देखील तीन महिन्यांत मोफत वीज दिली. आता गुजरात मध्ये जर आमचं सरकार आलं तर गुजरातमध्ये देखील मोफत वीज मिळेल.

भाजप केवळ आश्वासन देते, आम्ही गॅरेंटी देतो

केजरीवाल म्हणाले की, आम्ही गॅरंटी देतो की आम्ही मोफत वीज देईल. मात्र भाजप फक्त आश्वासन देतं. भाजपने सांगितलं होतं की ते १५ लाख देतील, मात्र तसं झालं नाही. आम्ही गॅरेंटी देतो, जर आम्ही असं केलं नाही तर पुढ्याच्या वेळी आम्हाला मतदान करू नका. केजरीवालांनी सांगितलं की आम्ही विजेच्या बिलाबाबत दिल्ली आणि पंजाब मध्ये तीन गोष्टी केल्या..

१) सरकार स्थापन झाल्यानंतर तीन महिन्यांनी दिल्ली आणि पंजाब मध्ये प्रत्येक परिवारास ३०० युनिट मोफत वीज दिली

२) २४ तास वीज मिळेल आणि तेही मोफत. कोणताही पॉवर कट नसणार.

३) ३१ डिसेम्बर २०२१ पर्यंतची सर्व जुनी बिल माफ करणार.

नुकतेच पंतप्रधान मोदींनी केजरीवाल यांना लक्ष करत त्यांच्या मोफत वीज वाटपावर टीका केली होती. टीका करताना त्यांनी याला ‘मोफत कि रेवडी’ असा शब्द वापरला होता. याला उत्तर देत केजरीवाल म्हणाले की मोफतची रेवडी ही देवाचा प्रसाद आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा