ट्विट कॉपी पेस्ट झाल्यास ट्विटर करणार ‘ही’ कारवाई

सॅन फ्रान्सिस्को, २९ ऑगस्ट २०२०: सेलिब्रिटी पासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वांमध्येच ट्विटर एक महत्त्वाचं सोशल मीडिया मध्यम आहे. जगभरात याचे १.३ अब्ज वापरकर्ते आहेत. पण आता ट्विटरने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर एखादा ट्विट कॉपी-पेस्ट होत असेल तर त्या ट्विटरवर आता ट्विटर कडून कारवाई केली जाणार आहे.

विशेष करून विविध पक्षांना तसेच संस्थांसाठी किंवा राजकीय पक्षांसाठी काम करणाऱ्या आयटीसेल कंपन्यांना याची डोकेदुखी होणार आहे. ट्विटर वर एखादा ट्रेंड सुरू झाला की वापर करते ते ट्विट कॉपी करून वारंवार पेस्ट करताना दिसतात. पण आता असे ट्विट कंपनी हाईड करणार आहे.

ट्विटरकडून या संदर्भात ट्विट करून सविस्तर माहितीही देण्यात आली आहे. ट्विटरकडून सांगण्यात आले आहे की, मागील काही वर्षांमध्ये त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कॉपी-पेस्ट ‘copypasta’ वाल्या ट्विटच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एकाच ट्विटला अनेकजण कॉपी करून ट्विट करत आहेत. अशावेळी आम्ही अशा ट्विटची व्हिजिबिलीटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा