पाटणा, १५ सप्टेंबर २०२२ : बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडत आरजेडी सोबत नवीन सरकार स्थापन केलं. पण बिहार राज्यातील घडामोडी तिथेच थांबलेल्या नाहीत. मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या दोन दिवसापूर्वी नितीश कुमार सोबत झालेल्या भेटीमुळे बिहारमध्ये दोघांची युती होण्याची चर्चा होत आहे.
नितीश कुमार सोबत झालेल्या भेटीचे प्रशांत किशोर यांनी याबाबत स्पष्टीकरण ही दिलं आहे. ते म्हणाले, या भेटीत आम्ही राजकीय सामाजिक या मुद्द्यावर चर्चा केली. यादरम्यान आम्ही कोणत्याही निष्कर्षना पर्यंत पोहोचलो नाही. तसेच पुढे बोलतात की माझ्या अभियानातून मी मागे हटणार नाही. माझी जनसुराज्य यात्रा ही सुरूच राहणार. मी बिहार राज्यातील सर्व जनतेला भेटणार आणि त्यांच्या भविष्याबाबत समजावून सांगणार आहे. या दरम्यान त्यांनी नितीश कुमार यांना दिलेल्या अटी विषयी पण सांगितले आहे. एका वर्षात १० लाख बेरोजगार तरुणांना नोकऱ्या दिल्यास मी नितेश कुमार यांच्यासोबत युती करणार असल्याचेही प्रशांत किशोर यांनी सांगितले आहे
एकीकडे हे दोघेही एकमेकांविरुद्ध वक्तव्ये करीत आहेत; तर दुसरीकडे रात्रीच्या अंधारात भेटीगाठी होत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माध्यमांना सांगितले होते की, प्रशांत किशोर यांना बिहारचे एबीसी तरी माहीत आहे का? ते तर व्यावसायिक आहेत. त्यांना भाजपमध्ये जायचे आहे. ते भाजपची मदत करतात. याला प्रत्युत्तर देताना प्रशांत किशोर यांनीही नितीशकुमार यांच्यावर टीका केली होती. दोघेही वरून टीका करतात व आतून भेट घेतात, असे दोन-चार दिवसांतच उघड झाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे