मास्क न घातल्यास कोविड सेंटर मध्ये पाठवा, गुजरात उच्च न्यायालयाचे निर्देश

अहमदाबाद, २९ नोव्हेंबर २०२०: कोरोनाच्या वाढत्या संक्रमणादरम्यान, गुजरात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. मास्क न घालणाऱ्या कडून दंड वसूल करावा आणि दंड लावून देखील सुधारणा न झाल्यास त्यांना कोविड सेंटरला सेवेसाठी पाठवावे, असे हायकोर्टाने सरकारला सांगितले.

सरकार सातत्यान लोकांना हे सांगत आहे की, जोपर्यंत कोरोनावर कोणतीही लस येत नाही तोपर्यंत फक्त मास्क वापरणे आपल्याला यापासून वाचवू शकते. सरकार सतत आवाहन करीत आहे की कोरोना लस लागू होईपर्यंत मास्क हा बचावाचा मार्ग आहे. परंतु असे बरेच लोक आहेत ज्यांचा यावर प्रभाव पडत नाही आणि ते मास्क शिवाय पकडले जातात.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन गुजरात उच्च न्यायालयाने सक्ती दर्शवली आहे. कोर्ट म्हणाले की, जो मास्क न घालता फिरत असेल त्याला कोविड कम्युनिटी सेंटरमधील नॉन-मेडिकल विभागात १०-१५ दिवस काम करण्याची जबाबदारी देण्यात यावी.

याबाबत सूचना देत कोर्टाने असे म्हटले आहे की लोकांना कोविड -१९ सेंटरमध्ये सेवेसाठी पाठवल्यास ते पुन्हा अशी चूक करणार नाहीत व त्यांना मास्क वापरण्याची सवय लागेल. कोरोना परिस्थितीबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे असे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा