मुंबईत मास्क न घातल्यास करावा लागणार रस्ता साफ

11

मुंबई, ३० ऑक्टोबर २०२०: देशातील कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. दररोज कोरोना विषाणूची नवीन प्रकरणं समोर येत आहेत. देशात कोरोना विषाणूमुळं महाराष्ट्र सर्वाधिक बाधित राज्य आहे. दरम्यान, मुंबईत मास्क न घालणार्‍या लोकांकडून रस्ता स्वच्छ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना विषाणू हा मुंबई, महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. त्याचबरोबर, मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालण्यासाठी दंड भरण्यास सक्षम नसलेल्या लोकांना आता रस्ते साफ करण्यास सांगण्यात येत आहे. कोरोना विषाणूमुळं आता मुंबईत मास्क घालणं आवश्यक झालं आहे.

त्याच वेळी, अंधेरी वेस्ट, वर्सोवासारख्या भागात मास्क घालण्यास आणि दंड भरण्यास असमर्थ असलेल्यांवर बीएमसीनं कारवाई केलीय. त्याअंतर्गत, दंड न भरणाऱ्या लोकांकडून महानगरपालिकेनं रस्ते साफ करून घेतले आहेत. त्याचबरोबर लोकल ट्रेनमध्ये मास्कशिवाय प्रवास करणार्‍या लोकांनाही दंड ठोठावण्यात येईल, अशा सूचना महाराष्ट्र सरकारनं दिल्या आहेत.

महाराष्ट्र हे देशातील सर्वात जास्त प्रभावी राज्य आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत १६.५ लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची पुष्टी झालीय. त्याच वेळी, कोरोनामुळं ४३ हजारांहून अधिक लोक मरण पावले आहेत. महाराष्ट्रात सध्या १.२७ लाखांहून अधिक सक्रिय कोरोना प्रकरणं आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा