फलटण, सातारा २० फेब्रुवारी २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलच तापलय. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे विद्यमान खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांच्या विरोधात असुन बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या खासदारकीसाठी ते प्रयत्नशील आहेत.
रणजीतसिंगांना उमेदवारी मिळू देणार नसल्याचा इशारा भर सभेत त्यांनी दिला होता. याला प्रत्युत्तर देताना फलटण येथील सुरवडी येथे एका कार्यक्रमात खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी दिलय. तुम्ही मला अडवणार म्हणजे या तालुक्याच्या विकासाला अडवणार. त्यामुळे तुम्ही मला अडवून दाखवाच असं खुले चॅलेंज रामराजे नाईक निंबाळकर यांना त्यांनी दिलय
न्युज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार