नोकरी हवी असेल तर आमच्याकडे ड्रायवरची जागा रिकामी आहे

पुणे, ०७ ऑगस्ट २०२२: निलेश राणेंनी दिपक केसकररांना दिली ऑफर, नोकरी हवी असेल तर आमच्याकडे ड्रायवरची जागा रिकामी आहे.

भाजपचे नेते निलेश राणे आणि दिपक केसरकर यांच्यातील वाद आणखी चिघळला असून राणे व केसकर यांनी एकमेकांची लायकी काढली आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत केसकरांना टोला लगावला आहे. “आमच्याकडे ड्रायवरची जागा रिकामी आहे.

दिपक केसरकर म्हणले मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे. निलेश राणे यांनी टोला लगावला नोकरी मागायची असेल तर नीट मागा. निलेश राणे हे ट्विट करत म्हणाले आमच्याकडे १ तारखेपासून ड्रायवरची जागा रिकामी आहे.

यापूर्वी निलेश राणे आणि शिंदे गटातील दिपक केसरकर याच्यातील वाद सुरू होतो. भाजपच्या कोणत्याही नेत्यांने उध्दव ठाकरे किंवा मातोश्री याच्या विरोधात केलेली कोणतीही टीका खपवून घेणार नाही,असे एकनाथ शिंदे गटातील दिपक केसरकर यांनी म्हटले आहे.

निलेश राणे हे नेहमीच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात टीका करतात. यावरून राणे व केसकर याच्यांत वाद सुरू असून निलेश राणे यांनी दिपक केसरकर यांची लायकी काढली आहे. तुम्ही एकनाथ शिंदे गटातील प्रवक्ते असून तुमची लायकी काय आहे हे चांगलेच माहिती आहे.

शिंदे गटात तुमची काय अवस्था आहे, शिंदे गटाने तुम्हाला दुसरे राजकीय जीवनदान दिले आहे. ज्या कुबड्या व इज्जत तुम्हाला मिळाली आहे त्या कुबड्यावर निट चालायला तरी शिका.यावर मी गप्प बसणार नाही असे निलेश राणे यांना दिपक केसरकर यांनी उत्तर दिल आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: विजय सपकाळ.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा