कोरोनाला रोखायचय मग रोगप्रतिकारक शक्ती वाढवा: योगगुरू रामदेव बाबा

पुणे, दि.८मे २०२० : कोरोनासारख्या महामारीचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनुलोम-विलोम, भस्रिका कपालभाती, योगासनाने श्वास घेण्याची व फुफ्फुसाची क्षमता वाढून शरीर बळकट करण्याची गरज आहे, तसेच जेवणात सात्विक आहार घ्यावेत, असे मार्गदर्शन योगगुरू रामदेवबाबा यांनी पिंपरी येथे केले.

पिंपरी येथील डॉ. डी. वाय . पाटील विद्यापीठामार्फत योगगुरु रामदेव बाबा यांच्याबरोबर बुधवारी( दि.६)रोजी ’योग वेब कॉन्फरन्स’ आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
सद्य परिस्थितीत सर्वत्र कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य डळमळीत होऊन त्याचा परिणाम शरीरावर होत आहे. या सर्वातून बाहेर पडण्यासाठी, मनोबल वाढविण्यासाठी, विशेष म्हणजे शारीरिक दृष्ट्या सुदृढ होण्याच्या उद्देशाने या ’वेब कॉन्फरन्स’चे आयोजन करण्यात आले होते.

या कॉन्फरन्ससाठी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त डॉ. स्मिता जाधव, खजिनदार आणि विश्वस्त डॉ. यशराज पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरंसद्वारे योग गुरु रामदेव बाबा यांच्याशी संवाद साधला. या ’वेब योग कॉन्फरन्स’मध्ये प्राचार्य डॉ. गुणवंत येवला यांनी डॉ. डी. वाय पाटील आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या आयसोलेशनची व्यवस्था नियोजित आहे. त्यामुळे आसने करणे फायद्याचे ठरणार आहे.

यावेळी योगा संदर्भातील सर्व प्रश्नांचे निरसन योग गुरू रामदेव बाबा यांच्या कडून करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. साफिया फारुकी यांनी केले. विश्वस्त डॉ. स्मिता जाधव यांनी आभार मानले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा