“इफ्फी” मध्ये आशियाई चित्रपटांची मांदियाळी

मुंबई : जगभरातील मानाच्या चित्रपट महोत्सवांपैकी एक समजला जाणारा ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फि) यंदा गोव्यात रंगणार आहे. हा महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे.
यंदाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त इफ्फीमध्ये आशियाई देशात ठसा उमटवणाऱ्या काही नव्या आणि वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांचा विशेष विभाग राहणार आहे.त्यातच ‘सोल ऑफ इंडिया’ म्हणजे आशियाचा आत्मा असे या विभागाचे नाव राहणार आहे.
या महोत्सवात हिंदी, इंग्रजी चित्रपटांबरोबरच प्रादेशिक भाषांतील २६ चित्रपटांचा समावेश असून ५ मराठी चित्रपटही दाखवण्यात येणार आहेत. याशिवाय १५ नॉन फिचर चित्रपट तसेच ५० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत.याशिवाय महानायक अमिताभ यांना यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे दर्जेदार चित्रपट या महोत्सवाचे आकर्षण असणार आहेत.
दरम्यान, यंदाच्या ५० व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ७६ देशातले २०० उत्तम चित्रपट, इंडियन पॅनोरमामध्ये २६ चित्रपट, १५ कथाबाह्य चित्रपट दाखवले जाणार आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा