बीड:२८ जूलै २०२२: डाॅक्टरांना आपण देव मानतो. डॉक्टर खरंच अनेकांचा प्राण वाचवतात. पण काही नराधम डॉक्टराचं सोंग करतात आणि सर्वसामान्यांना लुटतात. ते डॉक्टर बनून नको ते कृत्य करताय. अशाच एका बनावट
‘देवमाणूस’ डॉक्टरचा बीडमध्ये फुगा फाटला आहे.
हा डॉक्टर खरंतर एक कंपाउंडर होता. तो निसर्गोपचार केंद्र चालवायचा. अखेर त्याच्या कूकृत्यांचे कारनामे उघड झाले आहेत. आरोपीच नाव डॉ नंदकुमार स्वामी असं आहे. त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. परळीतील एक दाम्पत्यानं एका मित्राच्या मदतीने, डॉ. स्वामीकडे अवैधपणे गर्भलिंग चाचणी केली.
त्यात दुसऱ्यांदा मुलगी होणार हे कळलं. पती आणि सासूच्या सांगण्यावरुन डॉक्टरनं त्या महिलेल्या एक इंजेक्शन देत, महिलेच्या इच्छेविरोधात अवैधरित्या गर्भपात केला. या प्रकरणी परळी न्यायालयाने स्वामी याला ७ दिवसांची म्हणजे ४ ऑगस्टपर्यत पोलीस कोठडी दिली आहे. ज्या महिलेचा गर्भपात केला त्याच महिलेने परळी पोलिसांना दिली.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर















































