निलंगा, लातूर ६ जानेवारी २०२४ : निलंगा येथे वेगवेगळ्या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये तसेच रूम मध्ये काही इसम मटका नावाचा जुगार खेळत आहेत, अशा गोपनीय माहितीच्या आधारावर उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर यांनी छापेमारी करत जुगाराचे साहित्य आणि संशयितांना ताब्यातघेतले आहे.
निलंगा येथील शिवाजी चौक ते बँक कॉलनी रोडवर तसेच बँक कॉलनी परिसरात, औराद ते निलंगा जाणारे रोडवरील परिसरात, पिराजी नवनाथ कांबळे यांचे पत्र्याच्या घरामध्ये अशा चार ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करून बेकायेशीररित्या मटका जुगार खेळणाऱ्या आणि बुकी अशा एकूण ३३ इसमावर कार्यवाही करत त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख ९४ हजार ५९० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : सलीम शेख