इंदापूर, दि.३ सप्टेंबर २०२०: इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलिसांनी अवैध गुटखा घेउन जाणाऱ्या कंटेनरला पकडून ७६ लाख २४ हजार ७६० रुपयांचा गुटखा जप्त करुन मोठी कारवाई केली.
सदर कंटेनर (नं – के ए २२ डी २२७४) सोलापूरहुन पुण्याच्या दिशेने चालला असताना पोलिस कॉंस्टेबल इंकलाब पठाण यांना संशय आल्याने त्यांनी त्या कंटेनरचा पाठलाग करून चालकास ताब्यात घेतले. कंटेनर चालक करम हुसेन पिता हसन रजा चौधरी वय ३३ वर्षे रा. मुडीला, तहसील मेहदवाल रा. जि संत कबीरनगर राज्य उत्तरप्रदेश, शहजाद तुफेल खान, शादाब तुफेल खान दोघेही रा.कोंढवा पुणे. तर गुटखा उत्पादक एच आय तांबोळी ॲंड सन्स रा यरमाळ ता चिकोडी जि.बेळगाव (कर्नाटक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिगवणचे सहा. पोलिस निरीक्षक जीवन माने करीत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी – निखिल कणसे.