सांगडे जंगलात खैर तस्करीवर धाड; इको गाडी व दहा लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी फरार

खालापूर तालुक्यातील सांगडे येथील जंगलात खैराची तस्करी करत असलेल्या अज्ञात आरोपींवर खालापूर वनविभागाने धाड टाकली. या कारवाईत एका इको गाडीसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, मात्र आरोपी पसार झाले आहेत.

वनविभागाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर उपवनसरक्षक अलिबाग राहुल पाटील व सहाय्यक वनसंरक्षक पनवेल सागर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार आणि त्यांच्या टीमने रात्रीच्या वेळी धाड घालून कारवाई केली. आरोपी गाडीत खैराची लाकडे भरत असताना पकडले गेले.

तपासात गाडीत खैर लाकडाचे 40 ओंडके, पेट्रोल कटर मशीन, लोखंडी रॉड, लाकडी दांडके, मसाला मिरची पूड, मोबाईल व कीपॅड सापडले, जेवन वनविभागाने जप्त केले. यामुळे दहा लाखांचा मुद्देमाल हाती लागला.

कारवाईत खालापूर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार, चिलठण तपास अधिकारी संजय पांगारे, वनपाल खोपोली भगवान दळवी, वनपाल खालापूर नितीन कांबळे, वनपाल निगडोली पांडुरंग गायकवाड, वनरक्षक अंकुश केंद्रे, सागर टोकरेकोळी, प्रथमेश देवरे, कैलास कांबळे यांची महत्वपूर्ण कामगिरी होती.

आत्तापर्यंत आरोपी अज्ञात असून, अधिक तपास खालापूर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी दत्तात्रय शेडगे