नंदूरबार, ३१ जुलै २०२३ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अक्कलकुवा तालुक्यातील नवापाडा गावात छापा टाकला. निरीक्षक डी. एम. चकोर यांच्या नेतृत्वाखाली टाकलेल्या छाप्यात परराज्यातील मदयसाठ्यासह एकून ९ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी विभागीय उपआयुक्त डॉ.बी.एच.तडवी, अधीक्षक स्नेहा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कुडाची झोपडी, नवापाडा शिवार, अक्कलकुवा, जिल्हा नंदूरबार या ठिकाणी छापा टाकला असता तिथे एकूण ९ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही सर्व कारवाई निरीक्षक डी.एम.चकोर भरारी पथक नंदूरबार, बी.एस.महाडीक, एस.आर.नयन दुय्यम निरीक्षक, सागर इंगळे दुय्यम निरीक्षक, हितेज जेठे, संदीप वाघ, धनराज पाटील, राहुल शेवाळे यांनी सर्वांनी मिळून ही कारवाई केली आहे. पुढील तपास डी.एम.चकोर, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदूरबार हे करत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर