मला गर्व आहे “तिची” आई असल्याचा निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : निर्भयाच्या न्यायासाठी माझ्या कुटुंबियांना करावा लागलेला संघर्ष मोठा आहे. सात वर्षे प्रतिक्षा करावी लागली. कायद्याच्या वापर वाचविण्यासाठी केला. माझ्या मुलीला खऱ्या अर्थाने मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली.
या फाशीनंतर मुलांना चांगले संस्कार देण्याची जबाबदारी आईवडिलांची वाढली आहे. सात वर्षांच्या लढाईला न्याय मिळाला.
तिच्या नावाने मला दुनिया सलाम करते आहे. निर्भयाच्या नावाने मला ओळखले जावू लागले आहे. तिला वाचू शकले नाही, त्याचे दुःख आहे.
सहन करत राहू नका. अशा घटनांमध्ये मुलींच्या बाजूने उभे रहा. समाजाने तिच्या बाजूने उभे रहावे, असे आवाहन निर्भयाच्या आईने केले.
आरोपींनी वेळोवेळी वेगवेगळ्या याचिका दाखल करून फाशी लांबवली. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. ती लढाई लढणार आहे. अशा घटनांमध्ये अनेक आरोपी असल्यास त्यांना एकाचवेळी फाशी व्हावी, असा कायदा करावा.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा